

Washim
esakal
मानोरा: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते, याचे उदाहरण मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील बोरमळी धरणावर पाहायला मिळाले. रील तयार करण्याच्या नादात पुसद येथील १८ वर्षीय अंश विजय जयस्वाल या युवकाचा पाण्यात बुडून शुक्रवारी (ता. १३) दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियाच्या वाढत्या व्यसनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.