खड्ड्यांवरील खर्चाबाबत "हॉट मिक्‍स'चे "झोन'कडे बोट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर ः माहिती अधिकारात विभागाकडे असलेली वाहने, त्यावरील खर्चाची इत्थंभूत माहिती देणाऱ्या "हॉट मिक्‍स' विभागाने खड्डे बुजविण्यावरील खर्चाच्या तपशिलासाठी झोन कार्यालयाकडे बोट दाखविले. खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या "हॉट मिक्‍स' विभागाकडे खड्ड्यांवरील खर्चाची माहिती नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून ही अनभिज्ञता आहे की माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहरातील खड्डे जीवघेणे झाले असून नागरिकांत संताप आहे. नुकताच आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी हॉट मिक्‍स विभागाकडे खड्डे बुजविण्यावरील खर्चाचा तपशील माहिती अधिकारात मागितला. मात्र, त्यांना झोन कार्यालयाकडून माहिती घेण्याची सूचना हॉट मिक्‍स विभागाने केली. हॉट मिक्‍स विभाग केंद्रीय कार्यालय असून रस्त्यांवरील खड्डे, बुजविलेले खड्डे, त्यावरील खर्चाचा तपशील ठेवणे अपेक्षित आहे. किंबहुना या विभागाची ही जबाबदारीही आहे. परंतु, झोन कार्यालयाकडे बोट दाखवित हॉट मिक्‍स विभागाने जबाबदारी ढकलल्याचे चित्र आहे. हॉट मिक्‍स विभागाने गेल्या चार महिन्यांत 4874 खड्डे बुजविल्याचे माहिती दिली तर त्यावरील खर्चाची माहिती त्यांच्याकडे नसल्याचे नमूद केले. बुजविलेल्या खड्ड्यांची संख्या जाहीर करणारा हॉट मिक्‍स विभाग खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे की खर्चाबाबत अनभिज्ञ आहे? असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाला आहे. खड्ड्यांची संख्या व त्यावरील खर्चाच्या तपशिलावरून एक खड्डा बुजविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आकडा पुढे येते. मागील काही वर्षात या आकड्यातूनच हॉट मिक्‍स विभागाचे अनेकदा पितळ उघडे पडले. त्यामुळे खर्चाचा तपशील देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.

खड्ड्यांची संख्याही नाही
शहरात कुठल्या रस्त्यांवर किती खड्डे आहेत, याबाबतचा तपशीलही हॉट मिक्‍स विभागाकडे नसल्याचे दिलेल्या माहितीतून पुढे आले. गेल्या साडेतीन वर्षांत बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची संख्या देऊन हॉट मिक्‍स विभागाने बोळवण केली. मात्र, प्रत्यक्ष खड्ड्यांची संख्या देण्यास टाळण्यात आल्याने हॉट मिक्‍स विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बुजविण्यात आलेले खड्ड्यांची संख्या
वर्ष खड्डे
2016-17 9395
2017-18 9466
2018-19 11051
2019-20 4874 (एप्रिल ते जुलैपर्यंत)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regarding the cost of the pits The boat to the "hot mix's" zone