महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 2012 पासून आरोग्य मित्र काम करीत आहे. शासनाच्या आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यमित्रांची भूमिका महत्वाची आहे.
यवतमाळ : महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Phule Jan Arogya Yojana) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणार्या आरोग्य मित्रांच्या मागण्या प्रलंबित आहे. मागण्यामान्य होत नसल्याने मंगळवारी (ता. 18) पासून आरोग्यमित्रांनी कामबंद आंदोलन पुकारले असून जिल्हाकचेरीवर धडक देत मागण्याचे निवेदन दिले.