
Yavatmal : जातनिहाय जनगणनेचा संबंध ओबीसींच्या सर्वांगिण विकासाशी
वणी, (जि यवतमाळ) : जनगणनेमध्ये फक्त डोकी मोजली जात नाहीत तर त्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबींची गणना होत असते.म्हणुन देशस्तरावर ओबीसींची जनगणना म्हणजे ओबीसींच्या विकासाकरिता किती बजेट ठेवायचे, त्याची ब्लु प्रिंट आहे.
त्यामुळे ओबीसींचा रेटा जोपर्यंत वाढणार नाही तो पर्यंत जनगणनेचा निर्णय राज्यकर्ते घेणार नाही. करिता हा मुद्दा राजकीय होण्याकरिता लोकरेटा अनिवार्य आहे, असे प्रतिप मत प्रा हरि नरके यांनी व्यक्त केले केले. ते येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते.
बेलदार समाज बहुद्देशीय संस्था वणी द्वारे थोर स्वातंत्र्य सेनानी व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त येथील गव्हर्नमेंट शाळेच्या प्रांगणात मंगळवारी (ता. १०) सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक व विचारवंत प्रा हरी नरके यांचे व्याख्यान झाले.
यावेळी त्यांनी ' 'राष्ट्रहितासाठी ओबीसी, विजेएनटी व एसबीसी ची जनगणना करणे काळजी गरज' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार,प्रदीप बोनगीरवार,डॉ शिरीष कुमरवार उपस्थित होते.