छातीत दुखू लागल्याने मित्रांना कळवले, परंतु रुग्णालयात परिचारिकेनेच केले उपचार आणि...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

गोवर्धन डोळस मृत्युप्रकरणी डोळस यांची तपासणी करतेवेळी कोणतेच डॉक्‍टर कर्तव्यवर हजर नव्हते. डॉक्‍टरांनी मोबाइलद्वारे सांगितल्याप्रमाणे परिचारिकेने गोळ्या व इंजेक्‍शन दिले. तेव्हा आरोग्य अधिकारी अथवा डॉक्‍टर कर्तव्यवर हजर नसल्याने डोळस यांच्यावर योग्य उपचार झाले नाही.

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा येथील भारतीय स्टेट बॅंकेत गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत 38 वर्षीय युवकाचा मध्यरात्री ह्रदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मृतावर आज अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुपारी नातेवाईक व नागरिकांनी तिवसा पोलिस ठाण्यात धाव घेत डॉक्‍टरविरोधात तक्रार दाखल केली. सदर युवकाच्या मृत्यूसाठी डॉक्‍टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

गोवर्धन गणेश डोळस (वय 38, रा. आनंदवाडी तिवसा) असे मृताचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे तिवसा येथील एटीएमवर कार्यरत होता. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागल्याने डोळस यांनी मित्रांना फोन करून मला रुग्णालयात घेऊन चला असे सांगितले. त्यानंतर गोवर्धन यांना तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी रुग्णालयात डॉक्‍टर नसल्याने त्यांना केवळ दोन गोळ्या व इंजेक्‍शन देऊन घरी पाठविण्यात आले. योग्यवेळी गोवर्धनवर उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न! जगायचे तरी कसे; पिकले ते खपत नाही; पेरले ते उगवत नाही

गोवर्धन यांच्यावर तेथील परिचारिकेने औषधोपचार केले. मात्र, त्यावेळी डॉक्‍टर उपस्थित नव्हते, असा आरोप पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला. यावेळी मृताचे भाऊ निरंजन डोळस यांनी तिवसा पोलिसांत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन पोलिस निरीक्षक रिता उईके यांची भेट घेऊन डॉक्‍टरविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी डॉक्‍टरच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे दोषी डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

आरोग्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

गोवर्धन डोळस मृत्युप्रकरणी डोळस यांची तपासणी करतेवेळी कोणतेच डॉक्‍टर कर्तव्यवर हजर नव्हते. डॉक्‍टरांनी मोबाइलद्वारे सांगितल्याप्रमाणे परिचारिकेने गोळ्या व इंजेक्‍शन दिले. तेव्हा आरोग्य अधिकारी अथवा डॉक्‍टर कर्तव्यवर हजर नसल्याने डोळस यांच्यावर योग्य उपचार झाले नाही. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे डोळस यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित डॉक्‍टरवर गुन्हे दखल करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. दीपक सरदार, सागर भवते यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली. मागणीचे निवेदन तिवसा पो. स्टे.पोलिस अधीक्षक रिता उइके यांना दिले.

विदर्भाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

चुकीच्या औषधांमुळे मृत्यू

डॉक्‍टर यांनी कर्तव्यवर हजर न राहता मोबाइलद्वारे परिचारिकेला माहिती दिली. परिचारिकेने चुकीचे इंजेक्‍शन व गोळ्या दिल्याने गोवर्धन डोळस यांचा मृत्यू झाला. तेव्हा मोबाइलद्वारे परिचारिकेमार्फत उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह आरोग्य अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
ऍड. दीपक सरदार, युवानेते वंचित आघाडी.

बापाची माया हरवली

रोज नेहमीप्रमाणे पप्पा खाऊ आणतील या आशेने लहान मुलं वडिलांची वाट पाहत होते. पप्पा कुठे आहे, ही आर्त हाक ते आईला देत होते. मृत गोवर्धन डोळस यांना एक वर्षाची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. लहान वयातच बापाची माया हरवली. याची कल्पनासुद्धा त्या मुलांना नसून, वडिलांचया मृतदेहाकडे मुलं टक लावून बघत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relatives allege doctor responsible for Govardhan death

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: