नागपूर - अत्यंत कडक उन्हासाठी प्रसिद्ध असलेला मे महिना यंदा नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी दिलासा देणारा राहिला. एरवी ४६-४७ अंश सेल्सिअसवर जाणाऱ्या कमाल तापमानाने यावेळी मे महिन्यात त्रेचाळिशीदेखील पार केली नाही..जवळपास संपूर्ण महिनाभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशांनी घटल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच मे हा सर्वांत थंड महिना राहिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यंदाचा नवतपासुद्धा मागील तीन दशकांतील सर्वात सौम्य राहिल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली..चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक उन्हाच्या लाटा येत असल्याने प्रचंड ऊन तापते. या दिवसांमध्ये कमाल तापमान ४७ अंशांपर्यंत उसळी घेते. त्यामुळे उष्माघाताचेही रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.मात्र यावेळी महिनाभर पावसाळी वातावरण राहिल्याने कडक ऊन पडलेच नाही. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने सरासरी तापमानात चार ते पाच अंशांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मे मध्ये एकदाही विदर्भातील पारा ४३ किंवा त्यापेक्षा अधिक अंशांवर गेला नाही. नेहमी ४६ अंशांपर्यंत पोचणाऱ्या चंद्रपूर, ब्रह्मपुरीसारख्या भागांतही कमाल तापमान ४१-४२ अंशांच्या आतच राहिले आहे..केवळ एकदाच (२० मे रोजी) नागपूरचा पारा सर्वाधिक ४२.२ अंशांवर गेला होता. मागील दशकाचा विचार केल्यास, २०२३ मध्ये २३ मे रोजी एकदाच नागपूरच्या तापमानाने उच्चांकी ४२ अंशांपर्यंत उसळी घेतली होती. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे नागपूरकरांसह वैदर्भियांना मे मध्ये मोठा दिलासा मिळाला आहे..‘नवतपा’तही बसले नाही चटकेविदर्भात नवतपाच्या २५ मे ते २ जून या कालावधीत उन्हाळ्याचे तापमान सर्वाधिक असते. या नऊ दिवसांमध्ये हमखास उष्णतेच्या तीव्र लाटा येत असतात. मात्र यंदा या काळात विदर्भात कडक उन्हाळा जाणवला नाही.नऊ दिवसांत नागपूरचे कमाल तापमान एकदाही ४० अंशांवर गेले नाही. त्यामुळे यावेळी उन्हाचे चटके बसले नाही. शिवाय उकाडाही फारसा जाणवला नाही. सौम्य नवतपा राहण्याची गेल्या तीन दशकांतील ही पहिलीच वेळ असल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले..हवामान बदलाचा परिणामविदर्भातील या वातावरणासाठी प्रामुख्याने हवामान बदल व जागतिक तापमानवाढ कारणीभूत असल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले. अलीकडच्या काळात भर उन्हाळ्यात बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत.याच्या प्रभावामुळे एरवी येणाऱ्या उष्ण लाटांवर विपरीत परिणाम झाला व होत आहे. विदर्भात मॉन्सूनचे लवकर आगमन होणे, हाही हवामान बदलाचाच परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.