
चंद्रपूर : व्यंगचित्रकार, लेखक, विचारवंत चंद्रपूर भूषण ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांचे आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता सरकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांनी मृत्युपूर्वी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार आता त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे.