भारिप-बहुजन-महासंघ कार्यकारिणीत सर्व समाजाला प्रतिनिधित्व

Representation of all the communities in the Bharip Bahujan Mahasangh Executive
Representation of all the communities in the Bharip Bahujan Mahasangh Executive

अकोला : सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला वापरून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्हा परिषदेवर आपली पक्षाची सत्ता गेल्या 15 वर्षे पासून अखंडितपणे कायम ठेवली आहे.

यासोबतच मखराम पवार, बोडखे, डॉ. दशरथ भांडे, भदे, बळीराम सिरस्कर यांना आमदारकी देत यातील अनेकांना मंत्रिमंडळ मध्येही समावेश करण्यात आला होता. यातील भदे व सिरस्कर वगळता सर्वांनी पक्ष सोडून निघून गेले होते.

यासोबतच मुस्लिम समाजाला जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद देऊन त्यांना सत्तेतील त्यांचा हिस्सा दिला आहे. तर पक्षाचे पायाभूत मतदार असलेल्या बौध्द समाजाला श्रावण इंगळे, पुष्पा इंगळे, शरद गवई, यांनाही जि. प. अध्यक्षपदी विराजमान केले आहे.

त्यावेळपासून जिल्ह्यात सोशल इंजिनिअरिंग चा फॉर्म्युला सतत सुरू आहे. काही महिन्यांवर अकोला जिल्हा परिषदची निवडणूक होणार असून त्यामध्ये पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळावे, यासाठी सर्व जाती समावेशक जिल्ह्यातील नेत्यांना कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून अकोला जिल्ह्याची धुरा प्रदीप वानखडे यांच्या खांद्यावर आजपासून देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अनेक जुने कार्यकर्ते तर नवीन कार्यकर्ते यांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूकसाठी भारिप बहुजन महासंघ हा पक्ष सज्ज झाला असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com