फॉरेन्सिक लॅबसह निवासी गाळे पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याशी संबंधित असलेल्या उपराजधानीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आवारात तसेच येथील निवासी गाळ्यांमध्ये पाणी तुंबले आहे. विशेष असे की, दरवर्षी येथील परिसरात पाणी साचते. ही बाब मागील पाच वर्षांपासून निदर्शनास आणून दिल्यानंतरही ना महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत मिळत ना सार्वजनिक बांधकाम विभाग येथील दुरुस्तीकडे लक्ष देत. अशा बिकट अवस्थेत निवासी गाळ्यांमधील कर्मचाऱ्यांचे जगणे धोक्‍यात आले आहे. रहाटे चौकात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या शेजारी असलेल्या खोलगट परिसरातून पाणी थेट प्रयोगशाळा परिसरात शिरते.

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याशी संबंधित असलेल्या उपराजधानीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आवारात तसेच येथील निवासी गाळ्यांमध्ये पाणी तुंबले आहे. विशेष असे की, दरवर्षी येथील परिसरात पाणी साचते. ही बाब मागील पाच वर्षांपासून निदर्शनास आणून दिल्यानंतरही ना महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत मिळत ना सार्वजनिक बांधकाम विभाग येथील दुरुस्तीकडे लक्ष देत. अशा बिकट अवस्थेत निवासी गाळ्यांमधील कर्मचाऱ्यांचे जगणे धोक्‍यात आले आहे. रहाटे चौकात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या शेजारी असलेल्या खोलगट परिसरातून पाणी थेट प्रयोगशाळा परिसरात शिरते. येथील मध्यवर्ती कारागृह परिसरातील तळे भरल्यावर तेथून वाहणाऱ्या पाण्यातून सरपटणारे प्राणी तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे पाणी न्यायसहायक प्रयोगशाळा परिसरात तुंबते. सरपटणारे प्राणी थेट पाण्यातून कर्मचाऱ्यांच्या घरात शिरतात. जीवहानी झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात झालेल्या पावसाने तलावातील पाणी रहाटे प्रयोगशाळा परिसरात तुंबले आहे. ते काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत मागितल्यानंतरही कोणीच मुख्यमंत्र्यांच्या विभागात येत असलेल्या या प्रयोगशाळेतून पाठवलेल्या पत्राची दखल घेतील नाही. न्यायसहायक प्रयोगशाळेत दर दिवसाला हत्या, दरोडे, विष तसेच इतर मुद्देमाल रासायनिक विश्‍लेषणासाठी येथे येतो. येथील तपासणीतून सत्य पुढे आणण्यास मदत केली जाते. मात्र, संशयितांचे नमुने आणताना पाण्यात पडले किंवा या घाण वातावरणाचा परिणाम नमुन्यांवर झाला, तर आरोपींना सुटण्यास मदत होऊ शकते. अशा अतिमहत्त्वाच्या विभागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची खंत या विभागाकडून व्यक्त होत आहे. मात्र, न्यायसहायक प्रयोगशाळा प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिला. परंतु, वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंतचे 15 ते 18 परिवार येथे राहतात. येथे घाण पाणी साचल्यामुळे यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मेडिकलमधील अतिदक्षता विभाग तसेच वॉर्ड क्रमांक 18 व इतर ठिकाणी पाणी साचले होते. वऱ्हांड्यातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. विविध वॉर्डांत पाणी साचल्यामुळे अनेक रुग्णांच्या खाटा इकडून तिकडे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Residential boats with forensic labs in the water