esakal | कंत्राटी डॉक्टरांच्या खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध; वैद्यकीय अधीक्षकांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी डॉक्टरांच्या खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध; वैद्यकीय अधीक्षकांना पत्र

कंत्राटी डॉक्टरांच्या खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध; वैद्यकीय अधीक्षकांना पत्र

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (National Health Mission) जिल्ह्यात शेकडो वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खासगी वैद्यकीय व्यवसाय (Private medical profession from medical authorities) करण्यात येत होता. मात्र, आता या खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यावर शासनाने निर्बंध घातले (The government imposed restrictions) आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांना पाठविले आहेत. (Restrictions-on-the-private-medical-profession-of-contract-doctors)

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. परवानगी न घेता मुख्यालय सोडून खासगी व्यवसाय करीत होते. यामुळे शासकीय सेवेतील दैनंदिन कामावर परिणाम होत होता. याबाबतच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे अभियानाचे धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन होती. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

पत्रात नऊ अटींचा समावेश केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पूर्ण वेळ नियुक्त करण्यात येणाऱ्या डॉक्टर्सकडून सर्व अटींचा करारनामा लिहून घेणे. पत्र निर्गमित झाल्याच्या तारखेपासून कंत्राटी डॉक्टरांकडून खासगी वैद्यकीय व्यवसाय व अन्य संबंधित व्यवसाय करणार नाही याची दक्षता घेणे. खासगी व्यवसाय करताना आढळून आल्यास नोटीस बजावून खुलासा मागणे. विहित मुदतीला खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा असमाधानकारक खुलासा असल्यास नियुक्त प्राधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करणे, यासारख्या बाबींचा समावेश पत्रात आहे.

तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांना पत्राची अंमलबजावणी करण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी खासगी वैद्यकीय व्यवसाय बंद करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्र निर्गमित होऊन १५ दिवस लोटल्यानंतरही कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी वैद्यकीय व्यवसाय जोमात सुरू असल्याचे चित्र तालुक्यात आहे. यामुळे कार्यवाहीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे की हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.

(Restrictions-on-the-private-medical-profession-of-contract-doctors)