Crane Accident : क्रेनच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; वाडी पोलिस ठाण्यासमोरची घटना
Accident News : वाडी येथे रस्ता ओलांडताना क्रेनच्या धडकेत निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाडी : धम्म किर्तीनगर येथील रहिवासी दामोदर रामचंद्र रंगारी (वय ७०) यांचा बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वाडी पोलिस ठाण्यासमोर एका क्रेनने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटनेने धम्मकिर्ती नगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.