कोविडमधून परतला, खूनप्रकरणात अडकला; दोन अधिकाऱ्यासह चार पोलिस पॉझिटिव्ह

संतोष ताकपिरे 
Monday, 10 August 2020

त्यापैकी एक जण खून करण्याच्या चार ते पाच दिवसांपूर्वीच कोविड रुग्णालयात उपचार घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने खून केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये उघडकीस आली.

अमरावतीः गुन्ह्यात सहभागी संशयित आरोपींना पकडून पोलिस कोठडी घेणे, चौकशी करणे ही पोलिसांचा तपासाचा भाग आहे. परंतु आता त्यांच्यावरही सावध होण्याची वेळ आली आहे. कोविड रुग्णालयात चार दिवस उपचार घेऊन परतल्यानंतर त्याने खून केल्याची बाब उघडकीस आली.
दरम्यान, गाडगेनगर ठाण्यातील एका पोलिस निरीक्षकासह, एक उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी असे सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 1 ऑगस्ट 2020 रोजी शहरातील शोभानगरात पंकज गोकुल सिडाम (वय 28) या युवकास दोघांनी पकडून एकाने चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. त्या घटनेनंतर काही वेळातच दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एक जण खून करण्याच्या चार ते पाच दिवसांपूर्वीच कोविड रुग्णालयात उपचार घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने खून केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये उघडकीस आली. 

हे वाचा—कोरोना लस : ५५ व्यक्तींवरील निरीक्षण सकारात्मक; आता दुसरा टप्पा, या शहरातील चाचण्यांकडे लक्ष

अटक केल्यानंतर पोलिसांनी सदर संशयितास तपास अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले. त्याची पोलिस कोठडीत घेतली. शस्त्र जप्तीसह चौकशी केली. दरम्यान, दोन दिवसांपासून अचानक संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक एक उपनिरीक्षकाची प्रकृती बिघडली. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून या दोन अधिकाऱ्यांसह त्याच्या संपर्कातील चार अशा सहा जणांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले असता सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. परंतु कोविड रुग्णालयात चार दिवस राहिल्यानंतर ज्याने खून केला त्याला जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा तो पॉझिटिव्ह होता किंवा नाही याबाबत, निश्‍चित माहिती सुमजू शकली नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले सहाही जण खूनप्रकरणातील संशयित व्यक्तीमुळेच पॉझिटिव्ह आले किंवा इतरांच्या संपर्कात आल्याने त्यांना बाधा झाली. याबाबत संभ्रम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Returned from Kovid, caught in a murder case; Four police positives, including two officers

Tags
टॉपिकस
Topic Tags: