
मौदा : महिन्याचा पहिला बुधवार व तिसरा बुधवार या दिवशी तहसील कार्यालय हे तुमच्या गावात तुमची समस्या ऐकण्यासाठी येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्ण महाराष्ट्रत मोहीम सुरू केली. त्यानुसंगाने आज महिन्याचा पहिला बुधवार असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी मौदा येथील पावडदौना येथे ‘महसूल विभाग आपल्या गावात’ या मोहिमेला सुरूवात केली.