थोरात म्हणाले, भाजपचा संधिसाधूपणा लोकांपर्यंत पोहोचविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोरात म्हणाले, भाजपचा संधिसाधूपणा लोकांपर्यंत पोहोचविणार

थोरात म्हणाले, भाजपचा संधिसाधूपणा लोकांपर्यंत पोहोचविणार

अमरावती : केंद्रात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष हा विविध मार्गांनी राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सज्ज आहेत. भाजपचा संधिसाधूपणा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकदिलाने काम करण्याच्या सूचना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केले.

शासकीय बैठकीसाठी श्री. थोरात शुक्रवारी (ता. २०) अमरावतीला आले होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजपच्या काळात केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. प्रत्यक्षात मात्र महागाईने कळस गाठला आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता भाजपला सत्तेतून खेचणे हाच एकमेव पर्याय असल्याचे थोरात म्हणाले.

हेही वाचा: संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

शहर तसेच ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर या एक अभ्यासू लोकप्रतिनिधी असून त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत अनेक नवनवीन योजना राबविण्यात त्या अग्रेसर असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. शहर तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी एकजुटीने काम करीत असल्याचेही ते म्हणाले.