Chandrapur Heatwave : 45.8°C चा थरार, ताडोबा सफारीसाठी पर्यटकांनी घेतली उलट वळण, अनेकांनी केले बुकिंग रद्द
Tadoba Safari Cancellation : चंद्रपूरमधील तापमानाची नोंद जगातील पहिल्या क्रमांकावर गेली आहे. त्यामुळे ताडोबा सफारीकडे पर्यटकांचा ओढा कमी झाला आहे, आणि अनेकांनी आपली बुकिंग रद्द केली आहे.
चंद्रपूर : तापमानात चंद्रपूर जगात पहिल्या क्रमांकावर नोंदविले गेले. हवामान खात्याने २५ ते २७ एप्रिल या कालावधीत उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आता ताडोबा सफारीकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. अनेक सफारींचे बुकिंग रद्द केले आहे.