निर्जंतुकीकरण न झाल्यास संसर्गाचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

नागपूर - मुसळधार पावसात आजूबाजूच्या घरांमधील सांडपाणी मेडिकल-मेयो व डागा रुग्णालयांचे वॉर्ड व ऑपरेशन थिऐटरमध्येही शिरले. रुग्णालयांत गटारांचे पाणी तुंबल्याने जंतू संसर्गाची भीती आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप या वॉर्डांमध्ये निर्जंतुकीकरणासंदर्भात पावले उचलली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

नागपूर - मुसळधार पावसात आजूबाजूच्या घरांमधील सांडपाणी मेडिकल-मेयो व डागा रुग्णालयांचे वॉर्ड व ऑपरेशन थिऐटरमध्येही शिरले. रुग्णालयांत गटारांचे पाणी तुंबल्याने जंतू संसर्गाची भीती आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप या वॉर्डांमध्ये निर्जंतुकीकरणासंदर्भात पावले उचलली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभाग, नेत्र विभाग, जुना कॅज्युअल्टी विभाग, नवा अपघात विभाग, आयसीयू, स्वाईन फ्लू वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष, एक्‍सरे विभाग, वॉर्ड क्र. 6, 22, 23, 24, 25, 26 तसेच व्हऱ्यांड्यांमध्ये पावसाचे, गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी साचले. वॉर्डांमधील स्वच्छतागृहांच्या नाल्या तुंबल्याने शौचमिश्रीत पाणीही शिरले. यामुळे रुग्णंच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दररोज मेयो-मेडिकलच्या बाह्य रुग्ण विभागात अडीच हजार रुग्णांची नोंद होते. परंतु, शनिवारी केवळ 181 रुग्णांना भरती केल्याची माहिती आहे. मेडिकलमध्ये गरीब रुग्णांसाठी कोट्यावधीची यंत्रणा आहे. मात्र, मुसळधार पावसात मेडिकलच्या छतामधून अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. यामुळे कोट्यवधींची यंत्रणेला धोका निर्माण झाला आहे. 

आयसीयूत घाण पाणी 
वॉर्ड क्र. 24 असलेल्या अतिदक्षता विभागासह स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे वॉर्डांमध्ये दुर्गंधी युक्त पाणी साचले होते. वॉर्डांत साचलेले पाणी पावसाचे दुर्गंधी युक्त पाणी शनिवारी ओसरले. अतिदक्षता विभाग तसेच महिलांच्या प्रसुती कक्षाचे निर्जंतुकीकरण आवश्‍यक आहे. सफाई झाली नाही तर अतिदक्षता विभागातील रुग्ण, प्रसूत महिला वॉर्ड, नवजात शिशुंच्या वॉर्डात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ शकतो, असे काही डॉक्‍टरांनी सांगितले. 

शनिवारची रुग्णांची नोंद 
बाह्यरुग्ण विभाग - 1,186 
आंतर विभागात भरती रुग्ण- 181 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: risk of infection disinfection