Tehsildar Inquiry:तहसीलदारांचे सीनेमॅटिक रिल्स, अखेर चौकशी सुरू; ७ दिवसात अहवाल होणार सादर

Risod Tehsildar Inquiry, Cinematic Reels, 7-Day Report प्रकरणाची विभागीय चौकशी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. विशेष चौकशी पथकाकडून तहसील कार्यालयातील कागदपत्रे, नोंदी आणि संबंधित प्रकरणांची तपासणी केली जात असून सात दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.
Risod Tehsildar Inquiry, Cinematic Reels,

Risod Tehsildar Inquiry, Cinematic Reels,

esakal

Updated on: 

रिसोड, : येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सिनेमॅटिक रील्स सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे समाज माध्यमावर मोठे वादंग उठले होते. हे प्रकरण महसूलमंत्र्याच्या दालनात पोहोचल्यानंतर या प्रकरणाची विभागीय चौकशी एक आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे या चौकशीसाठी बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे आणि अमरावतीचे विभागीय साहाय्यक आयुक्त संतोष कणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सखोल चौकशी करून सात दिवसात समितीच्या अध्यक्षाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियुक्त केलेल्या विशेष चौकशी पथकाकडून तहसील कार्यालयातील संबंधित कागदपत्रे, नोंदी, गौण खनिज प्रकरणे, पांदण रस्ते, प्रशासकीय निर्णय तसेच तक्रारींशी संबंधित बाबींची सखोल तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विशेष पथकाकडून सात दिवसांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अहवालात नेमक्या कोणत्या बाबी निष्पन्न होतात आणि त्यानुसार प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते

, याकडे नागरिकांसह महसूल विभागाचे लक्ष लागले आहे. सिनेमॅटिक रील्समुळे तहसीलदार म्हणून चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि प्रशासकीय जबाबदारी याबाबतही चर्चा सुरू झाली होती. मात्र, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. विशेष पथकाच्या तपासणीतून वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चौकशी समितीच्या संदर्भात मला काही माहिती नाही, मला कोणीही बोलविले नाही. चौकशी समितीच्या सदस्यांसोबत माझी भेट झाली नाही. - प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार, रिसोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com