

Washim News
esakal
रिसोड: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात केवळ अकरा टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाली असून, मॉन्सून लांबणीवर गेल्यास शहरात अजूनही भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरात अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.