बोथलीच्या नदीत युवक गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

डव्वा (जि. गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्‍यातील बोथली-म्हसवानी रस्त्यावरील नदीत युवक वाहून गेला. ही घटना सोमवारी (ता. 2) दुपारी एकच्या सुमारास घडली. कार्तिक सोमेश्वर गौतम (वय 20, रा. म्हसवानी) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

बोथली-म्हसवानी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पूर आल्यानंतर परिसरातील युवक घोळक्‍याने अंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी येथे नेहमी जात असतात. सोमवारी कार्तिकसह म्हसवानी गावातील 10 ते 15 जण पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी पुलावरून नदीत उड्या मारल्या. मात्र, बराच वेळ होऊनही कार्तिक पाण्याबाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी कार्तिक नाल्यातील पाण्यात बुडाल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांसह कार्तिकच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठले. या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच त्यांनीही स्थानिक ढिवर बांधवांच्या मदतीने शोधमोहीम राबविली. अंधार पडल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the river of Bothali, the youth carried away