बेस्यातील रस्ते गेले खड्ड्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

बेसा: महापालिकेलगतच्या बेसा ग्रामपंचायत हद्दीतील बेसा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रस्ते खराब झाली आहेत. डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. गावातील अनेक रस्ते पावसामुळे वाहून गेल्याने गिट्टी बाहेर आली आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत असून ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. ओंकारनगर मार्गांच्या सिमेंटीकरणाचे बांधकाम कंत्राटदाराने अर्ध्यात सोडून दिले असल्यानेही नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

बेसा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रस्त्यांचे सिंमेटीकरण झाले आहे. विकासकामे सुरू आहेत. मात्र, नागपूर शहराला जोडणारे रस्त्यांकडे मात्र ग्रामपंचायत सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मनीषनगर टी पॉइंटला जोडणारा रस्ता खराब झाला आहे. मानेवाडा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवस सुरू होते. आता ते पूर्ण झाले असतानाही त्याच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. नागपूरला जोडणारा आणखी एक मार्ग असलेल्या ओंकारनगर मार्ग पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. या मार्गावरून वाहनचालकांना गाड्या चालविणेदेखील कठीण झाले असल्याचे चित्र आहे. बेसा पेट्रोलपंपापासून बेसा चौकापर्यंतच्या मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे वाहतूकदारांना आतमधून वाहने चालवीत आणावी लागत असल्याने अंतर्गत रस्ते खराब होत आहेत.
ओंकारनगर मार्गावरील कळंबे पीठगिरणीपासून मानेवाडा मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाताना गावातील पांदण रस्ते तरी बरे, अशी म्हणायची वेळ स्थानिकांवर आली आहे. अनेक नव्या ले-आउटमध्ये रस्ते झालेच नसल्याने वाहनचालकांच्या घरापर्यंत त्यांची वाहने पोहोचणेही दुरापास्त झाले आहे.
कंत्राटदाराने सोडले अर्ध्यातच काम
ओंकारनगर मार्गावरील नाला पार करताच रस्ता पाहूनच वाहनचालकांच्या मनात धास्ती भरते. रस्त्यावरील खड्डे झाकण्यासाठी गिट्टी टाकली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. रात्री पुलावर प्रकाशासाठी हायमास्ट लाइट लावण्याचे नियोजन होते. मात्र, तो लाइट राजकीय दबावात स्थानांतरित करण्यात आल्याने पुलावर अंधार असतो. या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम कंत्राटदाराने अर्ध्यात सोडून दिले आहे.

राजकीय अनास्था कारणीभूत
बेसा ग्रामपंचायतीला नागपूर शहरालगतची सर्वाधिक विकसित होणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. राजकीय स्वार्थामुळे ग्रामपंचायतीला नागपूर महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. तर या ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावून नगर परिषद करण्याची चर्चाही अधामधात रंगते. मात्र, राजकीय अनास्थेचा फटका येथील विकासकामांना बसत आहे. बेस्यातील नागरिकांना "वोट बॅंक' म्हणून वापर करण्यात येत असल्याचेही मत स्थानिकांनी नोंदविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roads in the basement have gone into a pit