गडचिरोलीतील रस्ते गेले खड्ड्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

गडचिरोली : रस्त्यांवरील खड्‌डे जीवघेणे ठरत असून यात अनेकांचे जीव जात आहेत. खरेतर खड्ड्यांची संख्या इतकी वाढली आहे की, रस्तेच खड्ड्यात गेल्यासारखे चित्र दिसत असल्याचा आरोप करीत युवक कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शनिवारी (ता.17) कार्यकर्त्यानी चामोर्शी मार्गावर आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून सरकारचा निषेध करण्यात आला.

येथील चामोर्शी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अलीकडेच आलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यावेळी बरेच जण खाली कोसळून पडले; तरीही प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य खड्डेमुक्त करू व मुख्य मार्गावर खड्डा दाखवेल त्याला 1 हजार रुपये बक्षीस देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. निविदा मंजूर होईपर्यंत रस्त्याचे काम करता येणार नाही, असे अभियंत्यांनी सांगितल्याने कार्यकर्ते संतापले. त्यामुळे अभियंत्यांनी 3 दिवसांत सर्व खड्डे बुजवून रस्त्याचे काम करू, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
ठाणेदारांची मध्यस्थी
बांधकाम अभियंत्यांनी स्वत: आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. टेंडर पास होईपर्यंत रस्त्याचे काम करता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रोष वाढला. त्यानंतर अभियंत्यांनी 3 दिवसांत सर्व खड्डे बुजवून रस्त्याचे काम करू , असे आश्‍वासन दिले. तेव्हा सर्व युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. गांधी चौकात रस्त्यावर अधिकारी येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads in Gadchiroli have gone to the pits