esakal | Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह लाखो रुपये लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

robbery at muthoot finance in wardha

बँकेच्या खाली उभे असलेल्या महिला कर्मचार्‍याच्या पोटावर बंदूक रोखून तिला तिच्या वाहनाची चावी मागून तेच वाहन घेऊन दरोडेखोर पसार झाले.

Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह लाखो रुपये लंपास

sakal_logo
By
मनोज रायपुरे

वर्धा : शहरातील मध्यवस्तीत हॉटेल रामाकृष्णाच्या बाजूला असलेल्या मुथूट फायनान्स कंपनीवर काळे कपडे घालून आलेल्या चौघांनी बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकला. यात साडेतीन किलो सोने आणि 3 लाख 28 हजार रुपयांची रोख लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही घटना आज 17 डिसेंबरला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला.

हेही वाचा - पूरपरिस्थितीला दोन महिने लोटल्यानंतर केंद्रीय पथक २४ला विदर्भात, आता कशाची करणार...

मिळालेल्या माहिती नुसार, हॉटेल रामाकृष्णाच्या बाजूला असलेल्या मुथूट फायनान्समध्ये सकाळी 9 वाजताच्या सुमारास कुरिअर बॉय असल्याचे सांगून तिघेजण आले. त्यांच्या हातात बँकेतील तीन कर्मचार्‍यांच्या नाव असलेले लिफाफे होते. त्यांनी बँकेचे निरीक्षक करून खाली काळे कपडे घालून उभा असलेल्या पुन्हा एका सहकार्‍याला बँकेत बोलावले. काही वेळात बँकेतील तीन कर्मचार्‍यांना बंदूक आणि चाकू दाखवत बँकेतील लोखपालाच्या लोखंडी कठड्यात बंद केले. त्यानंतर बँकेत ग्राहकांचे जमा असलेले जवळपास साडेतीन किलो सोने आणि 3 लाख 28 हजार रुपये रोख लंपास केली. त्यानंतर तिघेही बँकेतून खाली उतरले. बँकेच्या खाली उभे असलेल्या महिला कर्मचार्‍याच्या पोटावर बंदूक रोखून तिला तिच्या वाहनाची चावी मागून तेच वाहन घेऊन दरोडेखोर पसार झाले. अवघ्या अर्ध्या तासात दरोडेखोरांनी गजबजलेल्या भागात दरोडा टाकल्याने पोलिसांसह सर्वांनाच आश्‍चर्य वाटू लागले आहे.

हेही वाचा - बापरे! चक्क मृतालाच जीवंत दाखवत हडपले साडेसतरा लाख

घटनास्थळावर पोलिस उपविभागीय अधिकार्‍यांसह पोलिसांचा ताफा दाखल झाला. फिंगर प्रिंट आणि स्केच साठी पोलिस कामाला लागले आहेत. वृत्त लिहिस्तोवर साडेतीन किलो सोने आणि 3 लाख 28 हजार रुपयांची रोकड सांगितल्या जात असली तरी त्यात अजून वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

loading image
go to top