esakal | Video : रोहित पवार म्हणतात, जन्म कोठेही घ्या कष्ट तर करावे लागणारच
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar says, We all have to work hard

कुठल्या परिवारात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते. मोठ्या कुटुंबात जन्म घेण्याचे फायदे असतातच. मात्र, कष्टाला पर्याय नसतो. कष्ट सर्वांना करावेच लागतात. मोठ्या कुटुंबात जन्म घेण्याचे जसे फायदे आहेत तशाच जबाबदाऱ्यादेखील असतात. पवार कुटुंबाचा एक भाग असल्याने आपण त्या कुटुंबाचा समाजाबद्दल असलेला विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले.

Video : रोहित पवार म्हणतात, जन्म कोठेही घ्या कष्ट तर करावे लागणारच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कुठल्या परिवारात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते. मोठ्या कुटुंबात जन्म घेण्याचे फायदे असतातच. मात्र, कष्टाला पर्याय नसतो. कष्ट सर्वांना करावेच लागतात. आपल्या मागच्या पिढीने जितके कष्ट घेतले तेवढे आपल्याला करावे लागले नाही. मात्र, तरीही त्यांच्याशी आपली तुलना केली जाते जे अयोग्य आहे. परंतु, पवार कुटुंबाचा एक भाग असल्याने आपण त्या कुटुंबाचा समाजाबद्दल असलेला विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.


प्रजासत्ताक दिनानिमित्त युवासंवाद प्रतिष्ठानच्या वतीने अभियंता भवनात युवासंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी युवकांनी विचारलेल्या राज्यातील विविध राजकीय तथा सामाजिक विषयांवर रोहित पवार यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. माजी मंत्री वसुधाताई देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील व्हाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, विलास इंगोले, राजेंद्र महल्ले, किर्तीमाला चौधरी, नितीन डहाके, श्री. जळमकर, अनिकेत देशमुख आदी मंचावर उपस्थित होते.

अधिक वाचा - फक्‍त मीच दोषी आहे ना... मग आत्मदहनाची परवानगी द्या

प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळायलाच पाहिजे. त्याच्यावर अन्याय होता कामा नये. संघटनेत प्रामाणिक असलेल्या कार्यकत्र्यांची दखल घेतली तर पक्ष युवकांबरोबर आहे, असा संदेश सर्वांपर्यंत जातो. त्यामुळे युवकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्‍त केले. सर्वच पक्ष युवकांकडे फोकस करतात. परंतु, निवडणुकीत तिकीट द्यायच्या वेळी प्रस्थापितांनाच तिकीट दिली जाते, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. मोठ्या कुटुंबात जन्म घेण्याचे जसे फायदे आहेत तशाच जबाबदाऱ्यादेखील असतात, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक युवासंवाद प्रतिष्ठानचे नितीन पवित्रकार यांनी केले. अनिकेत देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी युवासंवादचे पवन राठी, नितीन धर्माळे, महेश तराळ, राहुल इंगळे, राजेंद्र ठाकरे, ऍड. रूपेश सवई, स्वप्नील धोटे, आशीष टेकाडे, भूषण डहाणे, आकाश वडतकर आदींनी सहकार्य केले.