esakal | स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
sakal

बोलून बातमी शोधा

amc

राहुल देशमुख, संजय बडोणे, हरीश काळे, विजय इंगळे यांच्यात स्पर्धा

स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोल : महानगरापालिका स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची निवड झाल्यानंतर आता सभापतीपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाले आहे. या प्रामुख्याने भाजपचे गटनेते राहुल देशमुख आणि संजय बडोणे यांची नावे आघाडीवर असून, हरीश काळे आणि विजय इंगळे यांची नावे चर्चेत आहेत.

महानगरपालिकेच्या 16 सदस्यी स्थायी समितीमध्ये 10 सदस्य भाजपचे आहेत. त्यातील पाच सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ 29 फेब्रुवारी रोजी संपला. त्यांच्या जागी नवीन पाच सदस्य निवडण्यात आले. आता या दहा सदस्यांमधून या पंचवार्षिक मधील चौथे स्थायी समिती सभापतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. त्यासाठी राहुल देशमुख आणि संजय बडोणे यांची नावे आघाडीवर आहेत. हरीश काळे हे आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय असल्याने आणि महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या गुडबूकमध्ये असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे.

दुसरीकडे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निकवर्तीय नगरसेवकांपैकी एक समजले जाणारे विजय इंगळे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र त्यांना व संजय बडोणे यांना यावर्षी स्थायी समितीमध्ये स्थान मिळाल्याने त्यांना पुढल्या वर्षी पुन्हा सभापती होण्याची संधी मिळू शकते. राहुल देशमुख आणि हरीश काळे यांच्या दोन वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2021 मध्ये संपणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.


असे आहेत स्थायी समिती सदस्य
भाजप  : राहुल देशमुख, दिपाली जगताप, हरीश काळे, अनिता चौधरी, अनिल मुरुमकार, सतीश ढगे, संजय बडोणे, आशिष पवित्रकार व विजय इंगळे, माधुरी मेश्राम (अपक्ष)
काँग्रेस : चांदणी रवी शिंदे, अजरा नसरीन मकसूद खान
लोकशाही आघाडी : शितल मनोज गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण बोराखडे ( भारिप-बमसं)
शिवसेना  : राजेश मिश्रा, शशिकांत चोपडे

loading image