Video : मोहाच्या झाडाखाली देव असल्याचे पडले स्वप्न, नागरिकांनी केली गर्दी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

या झाडाला कवटाळले असता, अनेक आजार बरे होतात, अशी श्रद्धा तेथे येणा-या भाविकांमध्ये आहे. मध्यप्रदेशातूनही आता त्याठिकाणी भाविकांची गर्दी होणे सुरू झाले आहे. या संधीचा लाभ घेत काहींनी तेथे पूजा साहित्य, चहा, नाश्त्याची दुकाने थाटली.

वरुड (जि. अमरावती) : तालुक्यातील भेमडी गावात असलेल्या मोहाच्या झाडाखाली देव असल्याच्या चर्चेमुळे भेमडी गावात नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर लगतच्या मध्य प्रदेशातून सुद्धा  दर्शनाकरिता नागरिक पोहोचत आहेत. हा सारा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा असून याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन अंनिसने केले आहे.

 

 

 

भेंमडी या आदिवासीबहुल गावात एका २५ वर्षीय युवकाला २ फेब्रुवारी रोजी रात्री स्वप्न पडले. गावातील मोहाच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला स्वप्नातून झाला. तरुणाने ग्रामस्थांना तो सांगितला. तो युवक ३ फेब्रुवारी रोजी गावातील त्या मोहाच्या झाडाजवळ गेला. त्यावेळी ते झाड जमिनीकडे झुकल्याचा भास त्याला झाला. पाहता पाहता ही वार्ता वा-यासारखी तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशात सुद्धा पसरली आणि अनेकांनी भेमडी गाव गाठायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर या ठिकाणी पोहचताच अनेक महिलांच्या अंगात देवी येत असल्याचे सुद्धा लोक सांगतात.

या झाडाला कवटाळले असता, अनेक आजार बरे होतात, अशी श्रद्धा तेथे येणा-या भाविकांमध्ये आहे. मध्यप्रदेशातूनही आता त्याठिकाणी भाविकांची गर्दी होणे सुरू झाले आहे. या संधीचा लाभ घेत काहींनी तेथे पूजा साहित्य, चहा, नाश्त्याची दुकाने थाटली.

तक्रारपेटी होती म्हणून उघडकीस आले शिक्षकाचे हे कृत्य, अन्यथा... 

अंधश्रद्धेला बळी पडू नये
भेंमडी गावात गेल्या २५ दिवसांत मोहाच्या झाडाखाली देव अवतरले आणि प्रसिद्धीसही आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आम्ही भेंमडी गावातील त्या मोहाच्या झाडाजवळ जाऊन खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार तास त्या झाडाखाली थांबलो. झाड जराही हलले नाही. झाडाला स्पर्श केल्यानंतर गरम वाफ निघाली नाही. तो परिसर आदिवासीबहुल असल्याने व मध्यप्रदेशातून लोक तेथे येत असल्याने देव असल्याच्या आणि देवी अंगात येण्याच्या पोकळ चर्चा सर्वत्र पसरविल्या जात आहेत. यामुळे कुणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष कमलाकर देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roumers in varud of amravati district