वृद्धांची भरपावसात हयात प्रमाणपत्रासाठी धावपळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : ऑनलाइनवर हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करा, तेव्हाच वृद्धापकाळाचे व निराधाराचे सहाशे रुपये मिळतील, राज्य शासनाच्या या आदेशाने आपला महिना थांबविला तर जाणार नाही या भीतीने हजारो वयोवृद्धांची भर पावसात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे.

राज्य शासनाकडून वयोवृद्ध व निराधारांना सहाशे रुपये महिना दिला जातो. ही रक्कम बॅंक खात्यात जमा केली जाते. वयोवृद्ध असल्याने लाभार्थ्यांचा मृत्यू होण्याची शक्‍यता असते. यामुळे दरवर्षी वयोवृद्ध व निराधारांना हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. मागीलवर्षीपर्यंत हे काम ऑफलाइन केले जात होते. यावर्षीपासून हे काम ऑनलाइन करावयाचे आहे. अनेक गावात ग्रामपंचायतीचे संगणकचालक हे काम करतात. पण त्यांचा संप असल्याने हजारो वयोवृद्धांचे लोंढे आता गोंडपिपरीत येऊ लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून तालुक्‍यात सतत पाऊस सुरू आहे. आपण ऑनलाइन अर्ज करून प्रमाणपत्र घेतले नाही, तर आपण लाभापासून वंचित राहू, ही भीती वयोवृद्धांना आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Run for the Certificate of Life in Compensation for the Elderly