पाण्यासाठी धावाधाव! पीडब्ल्यूडी कार्यालयावर धडकले रुग्णांचे नातेवाईक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नागपूर : पावसाळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वॉर्ड क्रमांक 17 मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नातेवाइकांनी पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. परंतु, सोय न झाल्यामुळे शनिवारी (ता. 31) रुग्णांचे नातेवाईक मेडिकलमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कार्यालयावर धडकले.

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील पाण्याची टाकी फुटलेली आहे. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी दिली होती. मेडिकलमधील विविध कामांच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु, या विभागाकडून पाहिजे तशी देखभाल होत नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्याची तसेच इतरही काही अडचणी येत असल्यास त्या कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु, कर्मचाऱ्यांकडून योग्य काम होत नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या नातेवाइकांनी मेडिकलच्या स्वच्छता निरीक्षक कार्यालयाला पाण्यासंदर्भात तक्रार केली. परंतु, येथील टाक्‍यांच्या दुरुस्तीचे काम न झाल्यामुळे पाणीसमस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही मेडिकलमध्ये निवासी डॉक्‍टरांनी पाण्यासाठी मोर्चे काढले. वॉटर कूलर बंद असल्यामुळे रुग्ण पाण्यापासून वंचित राहिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Run for the water! Relatives of the patient stabbed at the PWD office