

Washim
esakal
मालेगाव: तीव्र उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना, तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागू नयेत म्हणून गावातील राजू राठी आणि बाबाराव घुगे हे दोन दानशूर व्यक्ती देवदूतासारख्या धावून आले आहेत. यांनी स्वतःच्या शेतातील पाण्याचे स्रोत गावासाठी मोकळे करून दिल्याने, ते खऱ्या अर्थाने ब्राह्मणवाडावासीयांसाठी ‘भगीरथ’ ठरले आहेत.