साईबाबाचा वैद्यकीय तपासणी अहवाल शासनाकडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

नागपूर ः दिल्ली विद्यापीठातील बडतर्फ प्रा. जी. एन. साईबाबा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आवश्‍यक असलेले सर्व उपचार मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात असा अहवाल दिला आहे. दरम्यान, येथे त्यांच्या प्रकृतीकडे कोणतेही दुर्लक्ष होणार नाहीत. तशी काळजी घेण्यात येईल. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय संचालकांकडे सुपूर्द केला आहे. यानंतर शासनाकडे सादर करण्यात येईल. पुढे हा अहवाल मानवाधिकार आयोगाकडे दिला जाणार आहे.

प्रा. साईबाबा यांच्यावर उपचारात हयगय होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली होती. त्यानुसार माहिती अधिकारातूनही साईबाबांवर होणाऱ्या उपचारासंदर्भातील वैद्यकीय अहवाल मागितला होता. हाच संदर्भ घेत गुरुवारी मेडिकल व सुपर स्पेशालिटीतील वैद्यकीय पथकाची बैठक अतिशय गुप्तपणे झाली. याची खबरबात कोणालाही नव्हती. मध्यवर्ती कारागृहामार्फत अहवाल मागवला असल्याची चर्चा येथे होती. मात्र, मेडिकल प्रशासनाने थेट अहवाल न देता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला सादर केला. शासनाला सादर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
साईबाबाने "खासगी डॉक्‍टरांमार्फत तपासणी व उपचार करण्याची परवानगी द्यावी,' असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केला. तेव्हा त्या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने डॉ. एम. एफ. गोपीनाथ, डॉ. एन. प्रसाद आणि दिल्ली एम्स येथील डॉ. हजित भट्टी यांच्याकडून उपचाराला संमती दिली. परंतु, न्यायालयाने तपासणीदरम्यान मेडिकलच्या अधिष्ठात्याने निर्धारित केलेले डॉक्‍टर्स उपस्थित असतील, अशी अट घातली. या सर्व निदान चाचण्यांसह उपचार सुपर स्पेशालिटीतच होतील, असेही सुचविले होते. साईबाबाच्या पित्ताशयात खडे झाले आहेत. विशेष असे की, ह्रदयाचा आणि किडनीचा त्रास असल्याचे बोलले जाते. कमरेखालचा भाग निकामी आहे. प्रा. साईबाबा यांच्या पत्नीने न्यायालयामार्फत माहिती अधिकारात डॉक्‍टर्सचा अहवाल मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मेडिकल प्रशासनाकडून कोणताही अहवाल थेट देता येणार नसल्याची माहिती असून शासनाकडूनच अहवाल त्यांना प्राप्त होईल, अशी चर्चा येथे होती.
पाच वर्षांपूर्वी झाली होती अटक
दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. साईबाबावर माओवादी साहित्य लिहिण्याचा तसेच या विचारधारेचा प्रसार करण्याचा आरोप आहे. साईबाबा इन्टेलेक्‍च्युअल विंगमधील असून त्याच्यावर माओवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कम्युनिकेटर असल्याचाही आरोप आहे. त्याला 8 मे 2014 रोजी दिल्ली येथून अटक करण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saibaba's Medical Examination Report to Government