
नागपूर : उपराजधानीत ‘सकाळ माध्यम समूहातर्फे रविवारी(ता.९) ‘मॅरेथॉन- १० के’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण मैदानी खेळ, धावणे, चालणे हे सारे काही विसरत चाललो आहोत, ज्यामुळे आपल्याला तणाव आणि विविध आजारांचा सामना करवा लागतोय.