
वर्धा : नागपूर विभागातील मनपा सह नगरपालिकांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांचे तीन महिन्यापासून वेतन रखडले आहे. या शिक्षकांना गत अनेक दिवसांपासून आर्थिक टंचाईच सामना करावा लागत आहे. या शिक्षकांना रखडलेले वेतन तातडीने अदा न केल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी गुरुवारी (ता. १७) दिला आहे.