

Vidarbha News
esakal
सालेकसा: आदिवासीबहुल सालेकसा तालुका आजही मूलभूत विकासकामांपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येते. विविध स्तरांवर विकासाच्या चर्चा होत असल्या तरी तालुक्यातील अनेक गावे आणि ग्रामीण भाग अद्यापही सोयी-सुविधांसाठी प्रतीक्षेत आहेत.
नगर पंचायत क्षेत्र असलेल्या सालेकसामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या हलबीटोला परिसराकडे जाणारे दोन्ही मुख्य रस्ते रेल्वेस्थानक ते हलबीटोला आणि रेल्वे फाटक ते हलबीटोला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. गावातून जाणारा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.