समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते बदलविले

साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार
samagra Shiksha Abhiyan bank account Changed
samagra Shiksha Abhiyan bank account Changed

चंद्रपूर : राज्यात सत्तांतर झाले. नवीन सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक कामांवर स्थगिती आणली. त्यातून समग्र शिक्षा अभियानही सुटले नाही. समग्र शिक्षा अभियानाचा आर्थिक व्यवहार पूर्वी एक्सिस बँकेतून व्हायचा. मात्र, एन दिवाळीच्या तोंडावर समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते आता गोठविण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीत होण्याची शक्यता कमीच आहे.

राज्य शासनाने २००३ रोजी सर्वशिक्षा अभियान सुरू केले. शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले. अभियान सुरू झाल्यानंतर विविध पदांची भरती करण्यात आली. राज्यात जवळपास साडेपाच हजार कंत्राटी कर्मचारी या अभियानात कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी शासनदरबारी आहे. मात्र, त्याची आजवर दखल घेण्यात आली नाही. तुटपुंज्या वेतनावर हे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे.

या अभियानाचे नाव बदलवून समग्र शिक्षा अभियान करण्यात आले. समग्र शिक्षा अभियानाचा निधी पूर्वी एक्सिस बँकेत जमा व्हायचा. त्यातून योजनेचा निधी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येत होते. एक्सिस बँक अभियानाचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करायचे. त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) निधी वर्ग करायचे. तेथूनच या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचे वेतन जमा करायचे.

नव्या सरकारने अभियानाचे एक्सिस बँकेचे खाते गोठविले. सध्या एचडीएफसी बँकेची निवड करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बँक खाते बदलविण्यात आले. विशेष म्हणजे एक्सिस बँकेच्या खात्यात एक महिन्याचा वेतनाचा निधी जमा होता.

मात्र, आता बँकच बदल्याने ऐक्सिस बँकेतून तो निधी एचडीएफसी बँकेत जमा होईल.या सगळ्या प्रकाराला वेळ लागणार आहे. त्याचा फटका समग्र शिक्षा अभियानातील राज्यातील साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

शासनाने पूर्वीच्या बँकेचे खाते बंद करून दुसऱ्या बँकेत खाते सुरू करण्यात आले. राज्य शासनाच्या लहरी धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतनापासून मुकावे लागणार आहे. दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- सचिन देशट्टीवार, जिल्हाध्यक्ष,विषय साधन व्यक्ती संघटना चंद्रपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com