Sindkhed Raja Crime : समृद्धी महामार्गावरील १२ लाखाचा दरोडा उघड; आंतरराज्य टोळी बीड जिल्ह्यांतून जेरबंद, ८ आरोपींना अटक

सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ असलेल्या पुलावर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दापाश.
Sindkhed Raja Crime

Sindkhed Raja Crime

sakal

Updated on: 

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ असलेल्या पुलावर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दापाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरातून या टोळीतील ८ गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तल,जिवंत काडतुसे दोन वाहने आणि रोख रकमेसह १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com