संदीप जोशी नागपूरचे महापौर 

Sandeep Joshi Mayor of Nagpur
Sandeep Joshi Mayor of Nagpur

नागपूर : भाजपचे संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर झाले. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना 104 मते मिळाली. राज्यात भाजपशी संबंध तोडल्यानंतर शिवसेनेच्या येथील नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कॉंग्रेसच्या हर्षला साबळे यांना 26 तर बसपाच्या मोहम्मद इब्राहिम यांना 10 मते मिळाली. 

महापौरपदासाठी शुक्रवारी (ता. 22) महाल येथील नगरभवनमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली. उमेदवारी मागे न घेतल्याने भाजप, कॉंग्रेस व बसपा उमेदवारांत निवडणूक झाली. भाजपचे 108 सदस्य होते. यापैकी जगदीश ग्वालवंशी यांचे निधन झाले. सतीश होले यांना भाजपने निलंबित केले आहे तर दुर्गा हत्तीठेले यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. 

मनपातील भाजपचे उपनेते बाल्या बोरकर यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली. हात उंचावून मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. जोशी यांना 104 मतांसह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विजयी घोषित केले. उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा कोठे यांना विजयी घोषित करण्यात आले. कोठे यांना 104 तर राष्ट्रवादीचे दुनेश्‍वर पेठे यांना 26, बसपाच्या मंगला लांजेवार यांना 10 मते मिळाली.

अनेकांची अनुपस्थिती

या निवडणुकीपासून शिवसेना नगरसेवकांनी स्वतःला दूर ठेवले. नगरसेवक किशोर कुमेरीया व नगरसेविका मंगला गवरे अनुपस्थित होत्या. कॉंग्रेसचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com