Maharashtra vidhansabha 2019 : संदीप जोशी म्हणाले, मुख्यमंत्र्यांविरोधात मर्दासारखे लढा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपला टिकाव लागणार नसल्याच्या भीतीने विरोधकांनी आतापासूनच रडीचा डाव सुरू केला आहे. निव्वळ प्रसिद्धीसाठी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याचा आरोप महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी विरोधकांना शिखंडीसारखे वार न करता मर्दासारखे लढण्याचे आवाहनही केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊन अर्ज बाद करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे अध्यक्ष व अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी केला. यास जोशी यांनी प्रत्युत्तर दिले. उमेदवारी अर्जावरील नोटरीचा शिक्का हा 28 डिसेंबर 2018चा आहे. त्यानंतर नोटरीला 29 डिसेंबर 2023 पर्यंत पाच वर्षांची मुदतवाढ दिली आहे. आक्षेपावरील सुणावणीत देशमुखांचे आरोप रद्द ठरवत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. देशमुखांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप करून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती केली आहे. देशमुखांकडे असलेली कागदपत्रे ही चोरी करून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवल्याने याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही जोशींनी सांगितले. पत्रकार परिषदेला महापौर नंदा जिचकार, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे आदींची उपस्थिती होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep Joshi said, fight like a man against the Chief Minister