कागदावरील स्वच्छतेची बनवाबनवी उघड!

shashtri nagar
shashtri nagar
Updated on

अकोला : स्वच्छतेच्या नावाखाली महापालिका दर महिन्याला नागरिकांकडून वसुल केलेल्या करातून कोट्यवधीची उधळण करते. त्यातून स्वच्छता झाल्याचा गाजावाजाही केला जातो. मात्र स्वच्छता केवळ कागदावरच सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी अमानखाँ प्लॉटमधील शास्त्रीनगरात असलेल्या जिल्हा परिषद कॉलनीत उघडकीस आला. यातून मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची बनवाबनवीही उघड झाली.

जि.प.काॅलनी, शास्त्रीनगर,अमानखा प्लाॅट येथे एका नागरिकाकडे गुरुवारी सकाळी मनपाचा स्वच्छता कर्मचारी गेला. गल्लीतील कचरा साफ केला, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तो तरुण एका रजिस्टरवर नागरिकांना सही मागू लागला. एका सुज्ञ नागरिकाने खरोखरचं स्वच्छता झाली का म्हणून घरामागे जाऊन सर्व्हिस गल्लीची पाहणी केली. पूर्ण गल्लीत कचरा तसाच पडलेला आढळून आला. त्यांनी परत येऊन त्या तरुणाला गल्ली तर साफ झाली नाही, असे विचारले, तर सफाईचे काम सुरू असल्याचे त्याने सांगितले. त्या नागरिकाला गल्लीत एकही सफाई करणारा दिसला नाही, म्हणून त्यांनी ती माहितीही त्या तरुणाला दिली. सफाई करण्यापूर्वी सह्या का घेत आहेस, याबाबत जाब विचारताच त्या तरुणाने काढता पाय घेतला.


नागरिकही न बघताच करतात स्वाक्षऱ्या
एका सुज्ञ नागरिकामुळे गल्लीत स्वच्छता न करताही स्वाक्षऱ्या घेवून काम केल्याचा बनाव केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर कळस म्हणजे त्या नागरिकाने रजिस्टर बघितले तर सर्व्हिस गल्लीची सफाई झाल्याची साक्ष देणाऱ्या त्याच गल्लीतील काही इतर सुज्ञ नागरिकांनी चक्क त्या रजिस्टरवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कोणतीही सहानिशा न करता अशा सह्या करणे म्हणजे आपल्याच आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अकोला शहरात सुरू असल्याचे उघडकीस आले.


सत्ताधाऱ्यांच्या प्रभागातच ही अवस्था!
अमानखा प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्रीनगर...सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा प्रभाग. या प्रभागातच चक्क स्वच्छता न करता नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेवून स्वच्छता केल्याचा बनाव केला जात असल्याचा प्रकार उघडकील आला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतेबाबत शहरात नेहमीच गाजावाजा केला आहे. त्यानंतरही ही परिस्थिती आहे. त्याला जाबबदार, कोणतीही सहानिशा न करता स्वाक्षऱ्या करणारे ते सर्व नागरिक आहेत. त्यामुळे नागरिकांनी किमान आपल्या आजुबाजूच्या परिसरातील स्वच्छतेबाबत तरी जागृत रहाणे आवश्‍यक आहे.


सोशल मीडियातून फोडली वाचा
स्वच्छता न करता चक्क स्वच्छता केल्याचा बनाव केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी संबंधित नागरिकाने सोशल मीडियातून या प्रश्‍नाला वाचा फोडली. सुजान नागरिक असल्याचा आव आणणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात झनझनित अंजन टाकणाऱ्या या प्रकाराने महापालिका प्रशासनालाही चांगलीच चपराक दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com