esakal | 'संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासारखी भूमिका मांडली'; नाना पटोलेंचं भंडाऱ्यात वक्तव्य 
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut and nana patole

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "कोण प्रवीण कुंटे?" असा प्रश्न केलाय.  

'संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासारखी भूमिका मांडली'; नाना पटोलेंचं भंडाऱ्यात वक्तव्य 

sakal_logo
By
अभिजित घोरमारे

भंडारा ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे. आधी अँटिलीया -वाझेप्रकरण तर यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवारांची भेट यावरून वादंग सुरु आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या नेत्यांमध्येच आता जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "कोण प्रवीण कुंटे?" असा प्रश्न केलाय.  

हेही वाचा - संतापजनक! इंस्टाग्रामवरची ओळख पडली महागात! डान्स टिचरनं केला विद्यार्थिनीवर अत्याचार

नाना भाऊंनी तारतम्य ठेवून बोलावे.. नुसत्या धमक्या देऊ नये, तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते. त्यावर कोण प्रवीण कुंटे? मी ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी आज भंडारा इथे दिली. 

'शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सातत्याने आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत असतात.महत्वाचे म्हणजे शिवसेना ही काही आता युतीची सदस्य नाही, हे आम्ही त्यांना वारंवार सांगितले. आमच्या नेत्यांवर टिका करणे थांबवा, हेसुद्धा सांगितले. आम्ही सरकार नाही, पण आमच्यामुळे सरकार आहे, हेही सांगितले. तरीही ते त्यांना कळते की नाही, माहिती नाही. तुम्ही शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहात का, असा प्रश्‍न आम्ही संजय राऊत यांना केला' असं नाना पटोले म्हणाले.  

हेही वाचा - उमरेडच्या ध्येयवेड्या ओमीताची यशोगाथा! दिल्लीत उमटवला ठसा; इंस्पायरिंग वुमन पुरस्कारनं सन्मानित 

संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का? 

याचे कारण म्हणजे शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या चर्चा देशभर सुरू झाल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, तर त्याच्याही आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत ट्विट करून शरद पवार आणि अमित शहांची भेट झालीच नसल्याचे सांगतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यासारखी भूमिका त्यांनी काल मांडली. त्यामुळे जे आम्ही म्हणालो होतो, ते अगदी स्पष्ट आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ