Sant Gadge baba Amravati University : विद्यापीठाच्या पुरस्कार वाटपाला ब्रेक
University award : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पुरस्कार वितरणास व्यवस्थापन परिषदेकडून मंजुरी नसल्यामुळे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी ते थांबवले. पुरस्कार वितरणाच्या वाढीव संख्येवर वाद निर्माण झाला आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा मुद्दा सिनेटच्या सभेत चांगलाच गाजला. व्यवस्थापन परिषदेकडून मंजुरी नसतानाही या पुरस्काराचे वितरण करण्यात येण्याचा व त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला.