सरोदेनगर प्रभाग, वाठोड्यात नाहीत रस्ते

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

वाठोडा : पूर्व नागपुरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. चांगले रस्ते मिळावेत, स्वच्छ पाणी मिळावे, या मागण्यांकरिता पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसने रविवारी आंदोलन केले.
सरोदेनगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे साम्राज पूर्व नागपूरच्या विकासाला हिनवत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची चक्क चाळण झाली आहे. जीवघेणे खड्डे अपघाताचे कारण बनत आहेत.

महानगरपालिका अखत्यारीत येत असलेल्या या प्रभागात एकही रस्ताच नाही, हे तेवढेच नवल. प्रभाग 26 मध्ये घाणीचे साम्राज्य, डुकरांचा हैदोस आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात सापडले आहे. याविरोधात जनतेमध्ये रोष व्याप्त आहे. युवक कॉंग्रेसने जनतेची साथ देत प्रशासनाविरोधात हल्लाबोल केला आहे. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात पूर्व नागपूर अध्यक्ष अक्षय घाटोळे, आकाश गुजर, राहुल सिरिया आदींनी याविरोधात आंदोलन केले. या वेळी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात मुज्जू शेख, फझलुर रहमान कुरेशी, राजू वारजूरकर, दिलीप गुप्ता, नागेश धोपटे, दिनेश सातपुते, दुर्गेश हिंगणेकर, नितीन जुमळे, अझहर शेख, अखिलेश राजन, तुषार मदने, ऋषभ धुळे, अभिजित कोहर, आशीष दाते, मन मेश्राम, अभिषेक बडवाईक, निखिल बालकोटे, विक्की नटीये, प्रशांत तुमसरे, कुणाल शाहू, योगेश गायधने, नकील अहमद, फरदिन खान, इंद्रजित घुटके, संकेत जमगाडे व परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarodnagar ward, No roads