सतीश चतुर्वेदी म्हणतात, पक्षातील मरगळ दूर करू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

नागपूर : निलंबन रद्द झाल्यानंतर प्रथमच शहर अगमन करणारे माजी मंत्री व कॉंग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांचे त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर जंगी स्वागत केले. आपण निलंबित असलो तरी मनाने कॉंग्रेसमध्येच होते. आपण परत येताच पक्षातील मरगळ दूर झाल्याचे कार्यकर्त्यांच्या उत्साहावरून दिसून येते असे यावेळी चतुर्वेदी म्हणाले.

महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी आलेले तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी शाई फेकली होती. त्यानंतर काही नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याची दाखल घेऊन अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून शहरात कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली होती. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहोबत थोरात यांनी चव्हाणांना निर्णय फिरवरला. दीडच वर्षात चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेण्यात आले. निलंबन मागे घेतल्यानंतर आज प्रथमच चतुर्वेदी मुंबईवरून इंडिगोच्या विमानाने शहरात दाखल झाले. त्यांच्या शेकडो समर्थकांनी स्वागतासाठी विमानतळावर गर्दी केली होती. हार-तुरे देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर साई मंदिराचे दर्शन घेऊन चतुर्वेदी आपल्या निवासस्थानी परतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Chaturvedi says, we will remove the dirty people