सतीश चतुर्वेदी यांचे आज जंगी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नागपूर : निलंबनानंतर प्रथमच शहरात येत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे शहरात आगमण होत असल्याने नागपूर विमानतळावर त्यांचे समर्थकातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

नागपूर : निलंबनानंतर प्रथमच शहरात येत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे शहरात आगमण होत असल्याने नागपूर विमानतळावर त्यांचे समर्थकातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवारी (ता. 30) दुपारी साडेचारच्या सुमारास इंडिगो विमानाने ते मुंबईवरून नागपूरला येणार आहेत. विमानतळावरून वर्धा रोडवरील साईमंदिरात ते दर्शनाला जाणार आहेत. येथेही ते कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारणार आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे चतुर्वेदी यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. त्यानुसार, सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे खंदे समर्थक चांगलचे चिडले होते. चव्हाण यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती होताच चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा एक गट नाराज आहे. दुसरीकडे चतुर्वेदी यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. नागपूरला आल्यानंतर ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निलंबन रद्द करण्यात आल्याने माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाला जबर धक्का बसला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Chaturvedi will be Welcome today