
वणी (यवतमाळ) : साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे. त्याच्याबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत. आपल्याकडे आढळणाऱ्या अनेक सापांच्या जाती बिनविषारी आहेत. साप दिसला की लोक त्यांना मारायचे. हे प्रसंग लहानपणी अनेकदा बघितले. त्यामुळे मनाला खूप वेदना व्हायच्या. वयाच्या 14 व्या वर्षांपासून 14 वर्षांच्या काळात 700 वर सापांना पकडून त्यांच्या अधिवासात सोडून दिले, अशी माहिती वणी येथील ध्येयवेडा सर्पमित्र हरीश कापसे याने दिली.
साप हा दोन अक्षरी शब्द असला तरी या नावानेच चांगल्या चांगल्याना घाम फुटतो. साप दिसला की, तो विषारी आहे का बिनविषारी याची माहिती नागरिकांना नसल्याने त्याला मारले जाते. त्यामुळे झपाट्याने सरपटणाऱ्या जिवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वणी येथील साईनगरीत असलेला हरीश सुरेश कापसे हा तरुण सर्पमित्र म्हणून काम करत आहे. लहान असताना कुठे साप निघाला की, त्याला पहायला जात होता. नागरिक त्या सापाला मारून टाकायचे. त्यामुळे मनाला वेदना होत होती. आपण सर्पमित्र होऊन सापांना जीवदान दिले पाहिजे, असा विचार त्याचा मनात सातत्याने येत होता. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे असताना एक धामण जातीचा साप निघाला होता. नागरिक त्याला मारण्याच्या तयारीत असताना हरिशने त्याला पकडले व जंगलात सोडून दिले. तेव्हा साप पकडायला सुरुवात केली. त्यावेळी सापांबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे महाड पुणे येथे झालेल्या सर्पमित्र संमेलनात सहभाग घेऊन अधिक माहिती मिळविली. आपल्या कडे आढळत असलेले अनेक जातीचे साप हे बिनविषारी आहेत. तरीदेखील नागरिक त्यांना मारतात. वयाच्या 14 व्या वर्षापासून आतापर्यंत वायफर, घोणस, धामण, पानडीवर, कोब्रा, मण्यार, तस्कर, हरणडोकं मालवण, अजगर असे साप पकडले आहे. साप पकडल्यावर त्याची पूर्ण माहिती वनविभागाला दिली जाते. त्यानंतर पकडलेल्या सापांना जंगलात सोडतो. साप पकडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.
साप दिसला की नागरिक त्यांना मारून टाकतात, हे चुकीचे आहे. प्रत्येक साप हा विषारी नसतो तसेच साप हा शत्रू नाही तर शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याला आपण इजा पोहचवत नाही तोपर्यंत तो कोणालाही चावा घेत नाही. त्यामुळे सापांना मारू नये, साप निघाल्यास सर्पमित्रांशी संपर्क करावा.
हरीश कापसे, सर्पमित्र, वणी.
-संपादन ः चंद्रशेखर महाजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.