Savner Gram Panchayat Results
esakal
अशोक डहाके
केळवद : सावनेर तालुक्यातील केळवद आणि हत्तीसरा येथील ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी (ता.२९) जाहीर झाला. यामध्ये माजी मंत्री सुनिल केदार गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर आमदार आशिष देशमुख यांच्या गटाला या स्थानिक निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे. या निकालामुळे सुनिल केदार यांचे ग्रामीण भागातील वर्चस्व अधोरेखित झाले असून भाजपचे आमदार आशिष देशमुख यांना आत्मपरीक्षणाचा संदेश मिळाल्याचे मानले जात आहे.