

School Bag Policy
esakal
नंदोरी (जि.वर्धा) : विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दप्तराच्या जादा वजनाचा परिणाम होऊ नये तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी आणि कृतिप्रधान व्हावी, यासाठी विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना स्कूल बॅग पॉलिसी-२०२० मधील तरतुदींची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.