वाहनांचे हप्ते फेडायचे कसे? स्कूलबस व्यावसायिकांना १४ महिन्यांपासून नाही काम

school van
school vane sakal
Updated on

आसेगावपूर्णा (जि. अमरावती) : कोरोना महामारी (corona pandemic) सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी ने-आण करणाऱ्या वाहतूकदारांच्या प्रश्‍नांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे हाल सुरू झाले. 14 महिन्यांत कोणी गावाला निघून गेले, तर कोणी जोड व्यवसाय करायला लागले. कसाबसा कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी त्यांची धडपड सुरू असली तरी वाहनांच्या कर्जाच्या हप्त्याचे काय? महिन्याचे हजारो रुपये कसे फेडायचे? राज्य शासन लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल स्कूलव्हॅन व बस मालकांनी केला आहे. (school bus driver facing problems due to lockdown in asegaonpurna of amravati)

school van
18-44 वयाच्या लोकांना ऑनलाईन अपॉइंटमेंटशिवाय मिळणार लस

मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील लाखो स्कूलबस आणि व्हॅन व्यावसायिक देशोधडीला लागले असून कर्जबाजारी झाले आहेत. परंतु, कोणीही लक्ष घातले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पर्यायी जोडव्यवसाय करावा लागत आहे. काही चालकांनी भाजी व्यवसाय, रोजंदारीचे कामे हाती घेऊन आपला संसाराचा गाडा एक एक दिवस समोर ढकलत आहेत. दरम्यान येत्या जूनपासून तरी शाळा सुरू होणार का? याकडे या वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

लॉकडाउन काळात कर्जाचे हप्ते भरणे अशक्‍य आहे. कर्जाची मुदत वाढवून द्यावी. कर्जावरील व्याजदर माफ करावे. राज्य शासनाने रिक्षाचालकांना जी काही तुटपुंजी मदत जाहीर केली त्याप्रमाणेच स्कूलबस व व्हॅन मालकांना करावी. आमचाही संसार आहे. त्यामुळे आम्हालाही मदत मिळावी.
-विक्रम कोळस्कर, स्कूलबस मालक, आसेगावपूर्णा.
कित्येक महिन्यांपासून आमच्या गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत किमान या वाहनाच्या ईएमआयमध्ये काही प्रमाणात सूट मिळावी, अशी अपेक्षा आहे. व्यवसाय बंद आहे तर गाड्यांचे हप्ते कोठून भरावे, याचीच चिंता आहे.
-प्रवीण नांदणे, व्हॅनचालक, वासनी.
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी लहान व्हॅन होती. मात्र, शाळा बंद असल्याने माझे वाहन मला ओझे वाटू लागले. त्यामुळे नाइलाजास्तव मला वाहन विक्रीस काढण्याची वेळ आली. मात्र, खरीददार मिळत नाही. सध्या संसाराचा गाडा कसाबसा सुरू आहे. रस्त्यावर कोणताही व्यवसाय करायला गेलो तर प्रशासनाचा त्रास सहन करावा लागतो.
-गोलू नागले, बसचालक, गोविंदपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com