...असे होईल आघाडीचे जागावाटप- अजित पवार

...असे होईल आघाडीचे जागावाटप- अजित पवार

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्ष एकत्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाचा उमेदवार निवडून येणार, हे समोर ठेवूनच जागावाटप होणार आहे. निवडणुकी जाहीर होऊ द्या, कोण कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढणार, हे चित्र राज्यासमोर येईल, असे म्हणत युतीमधील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी (ता.21) पत्रकार परिषदेत केले.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.20) पवार यवतमाळात आले होते, त्यानिमित्त आज बुधवारी येथील माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश सरचिटणीस नानाभाऊ गाडबैले आदी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले की, जिल्ह्यात सोयाबीन व कापूस ही दोन महत्त्वाची पिके घेतली जातात. या पिकांचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. याउलट विमा कंपन्या हजारो कोटी रुपये गिळून बसल्या आहेत. या कंपन्यांच्या गैरव्यवहारामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू राहिलेलं नाही. पाच वर्षांत शेतकरी, महिला, युवक व तरुणांचे प्रश्‍न सोडविले गेले नाहीत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करोडो रुपयांची आश्वासने देण्याचं काम कॅबिनेट बैठकींमार्फत या फसव्या सरकारनं सुरू केले आहे.

पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे याचा कसलाही लाभ जनतेला होणार नाही. लोकांना आमिष दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक आश्वासनांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.

स्वार्थासाठी पक्षांतर
निवडणुका आल्या की, पक्षांतर होत असते. जे स्वताचा स्वार्थ पाहतात, ते आघाडीवर असतात. यावेळी सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराच्या चर्चेबद्दल विचारले असता, अजित पवार म्हणाले की, त्यांच्या आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात पूरपरिस्थिती होती. ते त्यांच्या भागात जनतेचे काम करीत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

राज्यातील शेतकरी व तरुणांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. यवतमाळमधील एका मोठ्या उद्योग समूहाने 300 कंत्राटी कर्मचारी कमी केलेले आहेत. ही परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे. रोजगार देऊ, असे सांगणारे आता रोजगार कमी करीत आहेत. - खासदार डॉ. अमोल कोल्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com