Hingna Flood : पूल ओलांडताना वाहून गेला सुरक्षारक्षक; मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला
Security Guard Drowned : हिंगणा तालुक्यात वादळी पावसानंतर वेणा नदीला आलेल्या पुरात एक सुरक्षारक्षक वाहून गेला. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून, आता त्यांच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत.
हिंगणा : तालुक्यात पहिल्याच वादळासह मुसळधार पावसाने वेणा नदीला आलेल्या पुरात बुधवारी रात्री एक मोटरसायकलस्वार सुरक्षारक्षक वाहून गेला. गुरुवारी त्याचा मृतदेह हिंगणा पोलिसांच्या हाती लागला.