

Vidarbha News
esakal
सिंदी (रेल्वे): निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या उन्हाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजावर आता ‘वणव्या’ने घाला घातला आहे. सेलडोह शिवारात लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंकित कलोडे यांचा गोठा डोळ्यादेखत जळून खाक झाला. या अग्नितांडवात एका निष्पाप कुत्र्याचा होरपळून अंत झाला, तर पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेली गाभण गाय गंभीर जखमी झाली आहे.