सेल्फी वेडामुळे कॉस्मेटीक बाजार ‘वयात’!

विवेक मेतकर
सोमवार, 16 जुलै 2018

वयात येणारी मुले फेसबुक, इस्टाग्राम आणि स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर सेल्फी व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करतात. आपण चांगले दिसावे यासाठीही ही मुले सजग असतात.

अकोला - प्रत्येकाला आपण चांगलं दिसावं असं नेहमीच वाटत असतं. मात्र, दहा ते बारा वयोगटातील मुलांमधील वाढते सेल्फी वेड हे आता सौदर्य प्रसाधने उत्पदक कंपन्यांच्या पथ्थ्यावर पडले आहे. ठराविक सौदर्यप्रसाधनांचा वापर वाढला असल्याचे एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

वयात येणारी मुले फेसबुक, इस्टाग्राम आणि स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर सेल्फी व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करतात. आपण चांगले दिसावे यासाठीही ही मुले सजग असतात. या वयात आवश्यक असणारी सौदर्यप्रसाधने मुले मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात.

  • खर्च वाढताच

पौगंडावस्थेतील मुलांना मुरुम, फुटकुळ्या, वांग व काळे डाग यासारख्यात्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावरमात करण्यासाठी मुले विविध सौदर्यप्रसाधनांवर खर्च करतात. विविध प्रकारची क्रीम, लोशन, फेस वॉश यासारख्या सौदर्यप्रसाधनांचे सासत्याने प्रयोग युवापिढी करताना आढळते.

  • सोशल मिडियाचा हातभार

मेकअपचा प्रचार करणाऱ्या इन्स्टाग्राम आयकॉन्सनी यात हातभार लावला आहे. मुलांना मोठ्याप्रमाणे चालणे-बोलणे आवडू लागते. त्यासाठी वेगवेगळ्या लुककडेही जास्त लक्ष देताना दिसतात. याचे प्रमाण आता खूपच वाढत आहे.

  • मुलेही आघाडीवर

दिसण्याच्या बाबतीत मुलीच नव्हे, तर मुलेही दक्ष असतात. तेही हेअर जेल व डिओ वापरतात. वाढत्या कनेक्टेड युगात चांगले दिसणे आणि वाडणे हे पूर्वीपेक्षा फारच महत्वाचे ठरत आहे. परफ्युमचे विविध ब्रॅन्ड युवकांत लोकप्रिय ठरत आहेत.
मुली आता १५-१६ वर्षाच्या होण्याआधीच स्कीन क्रीम, फेस वॉश, मेक-अप फाऊंडेशन, कलर कॉर्मेटिक्स आणि हेअर कलर वापरू लागल्या आहेत.

  • वयात लवकर येण्याचा परिणाम

एका अहवालानुसार काही सौदर्यप्रसाधने पूर्व पौगंडावस्थेतील मुलेही वापरतात. नेल आर्ट, सनस्कीन, काजळ, स्पॉटलेस क्रीम व हेअर कलरचा त्यात सामावेश आहे.

  • सहा वर्षांआधीच वापर

अलीकडील काळात मुले लवकर वयात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून पूर्वी जी सौदर्यप्रसाधने महिला १८ वर्षाच्या झाल्यानंतर वापरली जात, ती आता १२ व्या वर्षीच वापरण्यात येतात.

  • बाजारपेठही आली वयात

वयात येण्याबरोबर आपण चांगले दिसले पाहिजे ही प्रेरणा निर्माण होते. त्याचा परिणाम आहे. समाजमाध्यमांनी त्यात आणखी भर घातली आहे. सौदर्यप्रसाधनांची बाजारपेठ त्यामुळे कमालीची विस्तारली आहे.

टीनेजर्सना रंग उजलविण्या हल्ली छंद लागत आहे. त्यासाठी मित्र, मैत्रणीने किंवा ब्युटीपार्लर कडून विशिष्ट क्रीम सांगितल्या जाते. सुरवातीला उजळपणा वाढत असला तरी कालांतराने तशी सवय होऊन जाते. आशा क्रीम्स मूळे त्वचा पातळ व्हायला लागते, मुरूम किंवा त्वचेचे विकारही होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
- शुभांगी बिहाडे, त्वचारोग तज्ञ, अकोला.

Web Title: Selfie Fad And Cosmetics Trend